कशेडी बोगद्यालगतच्या मार्गावर कोसळत आहेत दरडी

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील बहुचर्चित कशेडी बोगद्यापासूनच्या मार्गावर दरडींसह दगड कोसळत असल्याने वाहनचालकांचा जीव टांगणीवर आहे. यामुळे वाहनचालकांची सुरक्षितता ऐरणीवर आली असून महामार्गावरील प्रवासात नव्या समस्येची भर पडली आहे. पहिल्याच धुवाँधार पावसात दरडी व दगड मार्गावर कोसळू लागल्याने वाहतुकीत प्रचंड अडसर निर्माण झाला आहे. कशेडीचे दोन्ही बोगदे ऐनकेन कारणाने चर्चेत राहिले आहेत.

या दोन्ही बोगद्यातून सध्यास्थितीत पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू झाल्याने प्रवाशांचा कशेडी बोगद्यापासून काही अंतरावरील मार्गावर कोसळणाऱ्या दरडी., प्रवास वेगवान अन आरामदायी झाला आहे. या सुस्साट प्रवासात आता बोगद्यापासून काही अंतरावर असलेल्या मार्गावर कोसळणाऱ्या दरडी व दगडांचा अडथळा उभा ठाकला आहे. गेल्या आठवडाभरापासून पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. सोमवारी दिवसभर पावसाने थैमान घातले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:06 PM 29/May/2025