यंदा जून ते सप्टेंबर या महिन्यांत १८ मोठ्या भरतीचे दिवस आहेत. या काळात पावणेपाच मीटरपर्यंतच्या लाटा उसळणार आहेत. मात्र त्याचबरोबर समुद्र, खाडी किनारी १४५ गावांनाही भरतीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
पावसाळा सुरू झाला की अतिवृष्टी, विजांचा कडकडाट त्यातच समुद्राला येणारी मोठी भरती यामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण होते. दरवर्षी समुद्राला ठरावीक कालावधीत मोठी भरती येत असते.
त्यामुळे एकीकडे पाऊस, तर दुसरीकडे खवळलेला समुद्र यामुळे समुद्रात लाटांचा खेळ सुरू होतो. मोठ्या भरती काळात समुद्र तसेच खाडी किनारी लाटांचा मारा होऊन समुद्राचे पाणी परिसरात घुसले जाते. त्यामुळे परिसरात पूरस्थिती निर्माण होत असते.
पावसाळ्यात पावणेपाच मीटर लाटा जून ते सप्टेंबर महिन्यात उसळणार आहेत. उसळणाऱ्या लाटांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक, स्थानिक हे समुद्रकिनारी येत असतात.
मात्र पावसाळी वातावरणात लाटांचा आनंद घेणे हे जीवाला धोकादायक ही ठरू शकते. त्यामुळे प्रशासनातर्फे या भरती काळात पोलिस तसेच जीव रक्षकांकडून नागरिकांना समुद्राच्या पाण्यात जाण्यापासून रोखले जाते.
या दिवशी समुद्रात लाटांचा खेळ
दिनांक – वेळ – उंची
२४ जुलै – दु. १२.५० वा. – ४.५७
२५ जुलै – दु. १२:४० वा. – ४.६६
२६ जुलै – दु. १.२९ वा. – ४.६७
२७ जुलै – दु. १.५६ वा. – ४.६०
१० ऑगस्ट – दु. १२.४७ वा. – ४.५०
११ ऑगस्ट – दु. १.१९ वा. – ४.५८
१२ ऑगस्ट – दु. १३.५२ वा. – ४.५८
२३ ऑगस्ट – दु. १२.१६ वा. – ४.५४
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:52 29-05-2025














