रत्नागिरी : जिल्ह्यातील सात धरणे ओव्हरफ्लो

रत्नागिरी : पूर्व मोसमी जोरदार पावसाने आणि त्यालागोलाग आलेल्या मोसमी पावसाच्या दमदार आगमनाने रत्नागिरी जिल्ह्याला पाणीदार केले आहे. जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठय़ात मे महिन्यातच चांगलीच वाढ झाली. एकूण 68 धरणांपैकी 7 धरणं 100 टक्के भरून ओव्हरफलो झालीत. तर 25 धरणं 50 टक्के पेक्षा जास्त भरली आहेत. गेल्या अनेक वर्षात प्रथमा मे महिन्यात धरणांया पाणीसाठय़ात वाढ झाल्यो चित्र आहे.

जिल्ह्यात अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झालेली होती. पण या पावसाने जिल्हावासियांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. जिल्ह्यातील दापोलीमधील सोंडेघर, सुकोंडी, पंचनदी, गुहागर धरण, चिपळूणमधील फणसवाडी, मालघर तर रत्नागिरी तालुक्यातील शीळ धरण, लांजामधील इंदवटी ही धरणं 100 टक्के भरली आहेत. तर मध्यम प्रकल्प असलेल्या नातुवाडी धरणात 28.49 टक्के, गडनदी धरणात 64.17 टक्के, अर्जूना धरणात 43.56 टक्के पाणीसाठा झाल्यी नोंद 28 मे रोजी पाणीपुरवठा विभागाच्या अहवालात नोंद करण्यात आली आहे. बुधवारपासून पावसाने जरी उसंत घेतली, तरी गेल्या 10 दिवसांमध्ये पडलेल्या मुसळधार पावसाने पाणलोट क्षेत्रात प्रचंड वाढ झालेली आहे. जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये सद्या एकूण 208.40 दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा झाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:56 AM 30/May/2025