मंडणगड : लाच प्रकरणातील ‘त्या’ तिघांना शनिवारपर्यंत कोठडी

मंडणगड : मंडणगड तहसील कार्यालयातील शेतजमिनीचा फेरफार नोंद करून तसा सातबारा उतारा देण्यासाठी पैसे घेतल्याप्रकरणी २७ मे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या महसूलच्या तिघांना ३१ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती विभागाचे पोलिस उपअधीक्षक अविनाश पाटील यांनी दिली.

शेतजमिनीचा फेरफार नोंद करून तसा सातबारा उतारा देण्यासाठी पैसे घेतल्याप्रकरणी २७ मे रोजी तहसील कार्यालयाच्या आवारात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत मंडळ अधिकारी म्हाप्रळ अमित शिगवण, म्हाप्रळ ग्राममहसूल अधिकारी श्रीनिवास श्रीरामे व उपकोषागार कार्यालयातील शिपाई मारूती भोसले यांना तीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 AM 30/May/2025