लांजा : लांजा शहरानजीक कुवे-माळवाडी घोडखिंड परिसरात गव्याचा संचार सुरू आहे. मे महिन्यात सुरू झालेल्या पावसामुळे हिरव्यागार झालेल्या जंगलमय भागामुळे मोठ्या प्रमाणात गव्याचा मुक्त संचार सुरू झाला आहे.
कुवे गावातील माळवाडी घोडखिंड या ठिकाणी दुपारच्या सुमारास एक भलामोठ्या गव्याला मुक्त संचार करत असल्याचे दृश्य येथील काही तरुणांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. हा गवा घोडखिंडमार्गे देवडोंगर येथे पुढे गेल्याचे तरुणांनी पाहिले. याच मार्गावर पुढे वनगुळे-इंदवटी येथे लोकांची ये-जा असते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 AM 30/May/2025














