लांजा : तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पडझडीच्या घटना घडल्या असून, आतापर्यंत ६ घरे, ३ गोठे व इतर मिळून आठवडाभरात सुमारे २ लाख ६२ हजार ४४४ रुपये नुकसान झाले आहे.
तालुक्यात नुकसान झालेल्यांमध्ये केळवलीतील लहू दत्ताराम भालेकर यांच्या घराचे २० हजार ३०० रुपये, आरगावमधील विलास खामकरांच्या घराचे १० हजार २३० रुपये, साटवलीतील दाऊद पठाण यांच्या घराचे ९ हजार ८६५, कोर्लेतील गोपाळ साळुंखे ७० हजार रुपये, केळंबेतील सखाराम लांबोरे ७ हजार ५८९ रुपये, साटवलीतील तैय्यब बरमारे ३३ हजार रुपये, देवधेतील विजय कांबळेंच्या गोठ्याचे ८५०० रुपये, पालूतील प्रदीप कांबळे ८७ हजार ६०० रुपये, रुणमधील नारायण अपकरे- १५ हजार ३६० रुपये, आसगेतील उर्मिला माने विद्यालयाच्या पडवीचे २१ हजार २३ रुपये, प्रभानवल्लीतील मुकुंद जाधव यांच्या संरक्षण भिंतीचे ६० हजार रुपये, साटवली शाळेचे २३ हजार २५६ रुपये, इंदवटीतील उमाजी इंदवटकर यांच्या घराच्या बांधाचे ३३ हजार ५०० रुपयांचे, उर्दू शाळेच्या संरक्षण भिंतीचे ४० हजार रुपये, बाळाराम सकपाळ यांच्या शौचालयाचे २२०० रुपयांचे, नौशाद नेवरेकर यांच्या कंपाउंड वॉलचे ३० हजाराचे नुकसान झाले. या सर्व नुकसानीचे पंचनामे करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 AM 30/May/2025














