खेड : आठवडाभर धो-धो कोसळणाऱ्या पावसाने मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध झाल्याने तहानलेल्या ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. १६ गावांतील १९ वाड्यांमध्ये धावणाऱ्या पाण्याच्या टँकरला “ब्रेक” लागला आहे. तालुक्यात ३ एप्रिलपासून टंचाईग्रस्त गाववाड्यांमध्ये टँकर धावत होता; मात्र आठवडाभर पडणाऱ्या पावसाने नदी, नाले प्रवाहित झाल्याने पाणीटंचाई संपुष्टात आली आहे.
घेरारसाळगड-बुथराईवाडी, खवटी खालची धनगरवाडी, वरची धनगरवाडी, चिरणी-धनगरवाडी, गुणदे-काळकाईवाडी, खवटी-वरचीवाडी, सवेणी-धनगरवाडी, केळणे-मांगलेवाडी, भोसलेवाडीत आटलेल्या जलस्रोतांमध्ये पाणी उपलब्ध झाल्याने पाणीटंचाईची चिंता मिटली आहे. कुळवंडी-शिंदेवाडी, कळंबणी बुद्रुक दंडवाडी, वावेतर्फे नातू ढेबेवाडी, तिसंगी-खांडेकरवाडी, धनगरवाडी, घेरारसाळगड-पेठवाडी, तांबडवाडी, बौद्धवाडी, निमणीवाडी, धनगरवाडी, भराडे-धनगरवाडी, मांडवे-वाडीबेलदार, हुंबरी-वाडीबीड, तळे-पालांडेवाडी, बौद्धवाडी, कासारवाडी येथेही धावणारा पाण्याचा टँकर बंद झाला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 30-05-2025














