रत्नागिरी : दहावी, बारावीचा निकाल लागल्यानंतर सर्वच पालकांमध्ये चिंता असते की, आपल्या पाल्यांना कोणत्या क्षेत्रात प्रवेश द्यायचा. मात्र आता पाल्यास लवकर नोकरी हवी असेल, तर आयटीआयचा पर्याय ही उपलब्ध आहे. दहावीनंतर दोन वर्षांच्या आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर झटपट नोकरी किंवा स्वःताचा व्यवसाय ही सुरू करू शकतो. जिल्ह्यातील शासकीय, अशासकीय आयटीआय प्रवेशासाठी अर्ज भरण्यास प्रारंभ झाले आहेत. अंतिम गुणवत्ता यादी ७ जुलैला प्रसिद्ध होणार आहे.
दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी ३ ते ५ वर्षे घालावी लागतात, त्यामुळे विद्यार्थी आता आयटीआयकडे वळले असून दोन वर्षांचा कोणताही कोर्स केल्यास नोकरी मिळते. घेण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. जिल्ह्यात १० शासकीय व ७ खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत १५ मे पासूनच अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. एचटीटीपी अॅडमिशन. डीव्हीईटी. गव्ह. इन या संकेस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
पहिल्या फेरीसाठी विकल्प सादर करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. एकूणच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा आयटीआयकडे कल वाढलेला दिसून येत आहे.
जिल्ह्यात १० आयटीआयमध्ये २ हजार जागा
रत्नागिरी जिल्ह्यात एकूण १० शासकीय आयटीआय असून प्रवेश क्षमता २,०९१ इतकी आहे. रत्नागिरी शहरात मुलींसाठी स्वतंत्र आयटीआय ही उपलब्ध आहे. तसेच खासगी सात औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आहेत. या केंद्रातील एकूण प्रवेश क्षमता ८८० इतकी आहे.
या कोर्सला आहे मागणी…
फिटर, वेल्डर, इलेक्ट्रीशियन, मशिनिस्ट, वायरमन, डिझेल मेकॅनिक, स्टेनोग्राफर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, ड्राफ्टसमॅन, मोटार व्हियेकल मेकॅनिक तसेच टर्नर, प्लम्बर, कारपेंटर, फॅशन डिझायनिंग, लेबोरेटरी असिस्टंट, हॉस्पिलेटी मेंटनन्स या कोर्सला मागणी असून यासह विविध अभ्यासक्रमास विद्यार्थी प्रवेश घेत असतात.
आयटीआयला अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. आयटीआयसाठी प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. विद्यार्थ्यांना प्रत्येक पसंतीक्रम देता येणार आहे. पहिल्या पसंतीक्रमानुसार संस्था मिळाल्यास तेथेच प्रवेश घ्यावा लागणार आहे, अन्यथा चौथ्या फेरीपर्यंत प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम व्यवस्थित द्यावा- शशिकांत कोतवडेकर, प्राचार्य आयटीआय, रत्नागिरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 AM 30/May/2025














