दापोली : दापोलीच्या पर्यटन क्षेत्रात आणि केळशी, आडे, मंडणगड या प्रवासासाठी महत्वपूर्ण असणारा हर्णे बायपास रस्ता साईड पट्टी खोदाईने खचत आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणारे प्रवासी आणि पर्यटक भीती व्यक्त करत आहेत. या मार्गावर पर्यटक आणि प्रवासी यांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून या मार्गाचे डांबरीकरण नुकतेच करण्यात आले आहे.
मात्र अशा रस्त्यांच्या साईड पट्टी खोदून वेगवेगळ्या कंपनीच्या केबल टाकल्या जात आहेत. त्यामुळे पावसाळ्यात याची धूप होऊन रस्त्याला हानी पोहचत आहे. टाकलेल्या केबल देखील वरवर असून पावसाच्या पाण्याने या केबल बाहेर पडत आहेत. या बाबत आता संबंधित कंपनीने आणि शासनाने लक्ष घालून रस्त्यांचा दर्जा आणि होणारी आपत्ती टळावी, या बाबत लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 AM 30/May/2025














