पावसाची विश्रांती : परशुराम घाटातील कामाला सुरुवात

चिपळूण : गेले आठ दिवस कोसळणाऱ्या पावसाने मंगळवारपासून विश्रांती घेतल्यानंतर बुधवारपासून अर्धवट राहिलेल्या कामांच्या ठिकाणी यंत्रसामग्री धडधड पुन्हा सुरू झाली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणांतर्गत परशुराम घाटात गॅबियन बॉलसह लोखंडी जाळी बसवण्याचे शिल्लक राहिलेले काम आणि शहरातील नद्यांमधील गाळ उपसाही सुरू झाला आहे. अंदाज घेत हळूहळू शेताच्या कामांनाही शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे.

मॉन्सूनपूर्वने जोरदारपणे हजेरी लावत नद्या, नाले तुडूंब झाल्यानंतर हंगामी पाऊसही दोन दिवसांपासून सर्वत्र सक्रिय झाला. गेले आठवडाभर कोसळणाऱ्या चिपळूण परशुराम घाटात पावसामुळे थांबलेले काम पुन्हा सुरू करण्यात आहे आहे. पावसामुळे ठिकठिकाणी सुरू असलेली विकासकामे जागच्या जागी ठप्प झाली. परशुराम घाटात घोकादायक दरडीच्या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून लोखंडी जाळी बसवली जात आहे. लोखंडी जाळी बसवण्याचे काम आता अंतिम टप्यात असताना अचानकपणे पाऊस सुरू झाल्याने सारी पंत्रसामुग्री जागच्या जागी उन्म झाली होती. शहरातील आशिश्री आणि शिवनदीत पाटबंधारे विभागाकडून सुरू असलेला गाळ उपसाही थांवला होता, किरकोळ प्रमाणात काठावरील गाळ उचलण्याचे काम सुरू होते मात्र पावसामुळे त्यामध्येही व्यत्यय आला होता.

पाऊस थांबण्यासाठी यंत्रणा वाट पाहात असताना मंगळवारपासून पावसाने विश्रांती घेतली. गुरुवारी आठ दिवसांनंतर सूर्यदर्शन झाले आणि कडकडीत ऊन पडले. परिणामी, थांबलेली विकासकामे पुन्हा सुरू झाली आहेत. परशुराम घाटात लोखंडी जाळी ठोकण्याचे तर गॅबियन वॉल भरावाची कामे सुरू करण्यात आली आहेत. गाळ उपशामध्ये पेठमाप, गणेश विसर्जन घाट आणि शिवनदी गाळ उपसा पुन्हा सुरू झाला आहे.

पावसाने भरलेली भातखाचरेही हळूहळू मोकळी होत आहेत. त्यामुळे आणखी दोन दिवस अंदाज घेऊन रखडलेली पेरणी आटोपती घेण्याच्यादृष्टीने शेतक-यांनी तयारी केली आहे. शेताच्या साफसफाईचीही अर्थवट कामे हाती घेण्यात आली असून, हवामान कोरडे राहिले तर चार ते पाच दिवसांत शेतीकामे पूर्ण होतील.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 30-05-2025