रत्नागिरी : पितांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आयोजित केलेल्या जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला.
रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा देवरूख येथील चितामणी मंगल कार्यालयात पार पडली.
स्पर्धेच्या उद्घाटनाला पितांबरीचे मॅनेजर श्रीहरी शौचे, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, उपाध्यक्ष सुरेंद्र देसाई, सदस्य विनय गांगण, प्राजक्ता देसाई, स्पर्धा प्रमुख मोहन हजारे, राज्यस्तरीय पंच मंदार दळवी, सागर कुलकर्णी आणि बहुसंखेने खेळाडू उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल असा – पुरुष एकेरी अंतिम फेरी – अभिषेक चव्हाण विजेता विरूद्ध राहुल भस्मे २० – १०, २५ – १०.
उपान्त्य फेरी १ – अभिषेक चव्हाण विजेता विरूद्ध अभिजितखेडेकर २५ – ११, २५ – ००
उपान्त्य फेरी २ – राहुल भस्मे विजेता विरूद्ध योगेश कोंडविलकर २५ – १३, २१ – १६
पुरुष दुहेरी अंतिम फेरी – अभिषेक चव्हाण / दत्ताराम वासावे विजेता विरुद्ध सौरभ महाकाळ / दिनेश पारकर २५ – ००, ११ -०८
उपान्त्य फेरी १ – अभिषेक चव्हाण /दत्ताराम वासावे विजेता विरुद्ध ओम पारकर / निलेश निवळकर ११ – १२, १२ – ०६, १८ – ००.
उपान्त्य फेरी २ – सौरभ महाकाळ / दिनेश पारकर विजेता विरुद्ध राहुल कदम / राजेंद्र कदम ०६ – ०२, २१ – ००
कुमार गट अंतिम फेरी – ओम पारकर विजेता विरुद्ध द्रोण हजारे १४ – ००, ०८ – १६, १० – ०४
किशोर गट अंतिम फेरी – स्मित कदम विजेता विरुद्ध सर्वेश आमरे १५ – ०४, ०९-०५
किशोरी गट अंतिम फेरी – स्वरा कदम विजेता विरुद्ध स्वरा मोहिरे १० – ०५, १० – ०९
स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे सेक्रेटरी मिलिंद साप्ते, जुने मानांकित खेळाडू दिलीप विंचू, पितांबरी प्रॉडक्ट्सचे विक्रेते वैभव साने, स्पर्धा प्रमुख मोहन हजारे, कॅरम राज्यस्तरीय पंच मंदार दळवी, सागर कुलकर्णी व बहुसंखेने खेळाडू उपस्थित होते. स्पर्धेतील काही सामन्याचे थेट प्रक्षेपण रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनतर्फे पहिलांद्याच यूट्यूबवर करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 12-10-2024