रत्नागिरी : कृषी विभागाकडून गुण नियंत्रणासाठी तक्रार निवारण हेल्पालाइन, भरारी पथके व तक्रार निवारण समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. निविष्ठांबाबत काही तक्रारी असल्यास तक्रार निवारण समितीकडे किंवा जिल्हास्तरावरील तक्रार निवारण हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करीत नियमांचे उल्लंघन केल्यास कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर थेट कारवाईचा इशारा कृषि विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.
जिल्ह्यात खरीप हंगाम २०२५ २६ करिता बियाणे, खते व कीटनाशके या कृषी निविष्ठांचा दर्जेदार तसेच सुरळीत व वेळेवर मुबलक पुरवठा होण्यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.
गुणवत्ता नियंत्रणाकरीता जिल्हास्तरावर व प्रत्येक तालुका स्तरावर भरारी पथके स्थापना केली आहे. जिल्हास्तरीय भरारी पथकाचे कृषि विकास अधिकारी, जि. प. रत्नागिरी हे पथक प्रमुख आहेत. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, रत्नागिरी हे सदस्य सचिव आहेत आणि तालुकास्तरीय भरारी पथकाचे तालुका कृषी अधिकारी हे पथक प्रमुख असून पंचायत समितीचे कृषी अधिकारी हे सदस्य सचिव आहेत. प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र अशी तक्रार निवारण समितीची स्थापना केली आहे.
खरीप हंगाम २०२५-२६ साठी रत्नागिरी जिल्ह्यातील ५६०१० हे क्षेत्रासाठी एकूण ५१९१ क्विटल वियाणे आवश्यक असून खतांचे एकुण १२९०७ मे.टन एवढे मंजूर आवंटण आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी नुकतीच बैठक घेवून शेतकऱ्यांना बांधाव खते, बियाणे वितरण मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत
तक्रार करायची तर या हेल्पलाईन क्रमांकावर करा
रत्नागिरी जिल्ह्यात बियाणे, खते पुरवठा सुरळीत सुरू झालेला आहे. शेतकऱ्यांनी कृषि सेवा केंद्रामधून आवश्यक कृषि निविष्ठांची खरेदी करून ठेवावी तसेच बियाणे, खते व किटनाशके खरेदीचे पक्के बील घ्यावे व निविष्ठा वापर करताना सुरक्षा उपयांचे काटेकोर पालन करावे तसेच निविष्ठांबाबत काही तक्रारी असल्यास तालुका स्तरीय तक्रार निवारण समितीकडे किंवा जिल्हा स्तरावरील तक्रार निवारण हेल्पलाइन क्रमांक ८८३०२६४३३५ ला संपर्क करावे, असे आवाहन कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.
खरीप हंगाम तोंडावर असून खरीप हंगामसाठी रत्नागिरी जिल्ह्यात बियाणे व खते पुरवठा सुरू झालेला आहे. नुकतीच निविष्ठा विक्रेत्यांची बैठक झाली असून चुकीच्या पध्दतीने कृषि निविष्ठा करणारे विक्रेते रडावर असतील, कोणत्याही अवैध व्यवहाराला पाठीशी घातले जाणार नाही, अशा वागणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल. शेतकऱ्यांना बनावट वियाण, बनावट खते अथवा बनावट किटनाशके विकणाऱ्या विक्रेत्यावर गुन्हे दाखल करू, कायदेशीर कारवाई करू त्यांचे परवाने निलंबित करू-शिवकुमार सदाफुले, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, रानागिरी
शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये
मे महिन्यामध्ये इतका कधीही पाऊस पडलेला नाही. पेरणी साधारणपणे जूनच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यामध्ये होत असते. म्हणजेच पेरणीचा हंगाम आणखी गेलेला नाही. पाऊस सतत पडत असल्यामुळे पेरणी पुढे गेली तरी चालल्यासारखे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दोन दिवस पेरणी करू नये. यापुढे ४ते५ दिवस पाऊस थांबल्यानंतर ऊन पडल्यानंतर भात पेरणी करणे सोईस्कर होईल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 PM 30/May/2025














