दापोली : तालुक्यातील तलाठी सजा देगाव या सजेला कायमस्वरूपी तलाठी मिळावा, अशी मागणी निवेदनाद्वारे देगाव येथील रमाकांत शिंदे यांनी तहसीलदारांकडे केली आहे.
देगाव सजेतील देगाव, फणसु, उर्फी गावांना देण्यात आलेले तलाठी हे गेले वर्षभर तलाठी कार्यालयात आले नाहीत. वर्षभर वेगवेगळ्या तलाठ्यांकडे देगाव सजेचा कार्यभार देण्यात आला होता. त्यामुळे गावातील लोकांना विविध शैक्षणिक दाखले आणि सातबारा मिळवण्यासाठी आर्थिक भुर्दंड सोसत तालुक्याच्या ठिकाणी हेलपाटे मारावे लागले. वर्षभरानंतर देगाव तलाठी हजर झाले; मात्र पुन्हा रजेवर गेले आहेत. त्यामुळे पुन्हा लोकांची गैरसोय झाली आहे. पुढच्या महिन्यात शाळा, कॉलेज सुरू होतील त्यामुळे मुलांना विविध प्रकारचे शैक्षणिक दाखले आवश्यक आहेत. हे दाखले वेळेत मिळाले नाहीत, तर मुलांना वेळेत शाळा व महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे आपण या निवेदनाचा विचार करून देगाव सजेला कायमस्वरूपी तलाठी द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे रमाकांत शिंदे यांनी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:07 30-05-2025













