कमी उत्पन्नामुळे रत्नागिरी आगाराची महाकार्गो सेवा बंद

रत्नागिरी : एसटी विभागाच्या वतीने विविध साहित्य, भाजीपाला, फळप्रूर यासह विविध सेवा देण्यासाठी महाकार्गोसेवा सुरू केली होती. कोरोनाच्या काळात जिल्ह्यासह राज्यात करोडोंची उलाढाल झाली. त्यामुळे एसटी विभागाचे उत्पत्नन वाढले होते. त्यानंतर महाकार्गो सेवेला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. रत्नागिरी आगारात प्रतिसाद नसल्यामुळे, उत्पन्नच मिळत नसल्यामुळे मागील एक वर्षापासून महाकार्गी ही सेवा बंद करण्यात आली आहे. यामुळे आगाराच्या नसल्यामुळे तब्बल आठ गाड्या जागेवरच थांबून आहेत.

एसटी महामंडळ मागील काही वर्षापासून आर्थिक अडचणीत सापडले होते. कोरोना काळात प्रवासी वाहतूक बंद असताना एसटी महामंडळाला मोठा फटका बसला होता. तो तोटा भरून काढण्यासाठी एसटी महामंडळाने २१ मे २०२० रोजी राज्यात महाकार्गो सेवा सुरू केली.

त्यासाठी बसमधील आसने, छत काढून त्याचे रूपांतर मालवाहू ट्रकमध्ये करण्यात आले. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यास राज्यभरात या सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे पहिली मालवाहतूक रत्नागिरीहून बोरिवलीत आंब्याच्या पेट्या घेवून आली होती. त्यामुळे याला चांगला प्रतिसाद मिळाला. याचा फायदा रत्नागिरी आगाराला मिळाला. मात्र कोरोनाचा कहर संपल्यानंतर काही वर्षानंतरच महाकार्गी सेवेला उतरती कळा लागत आहे. रत्नागिरी आगारातील महाकार्गी सेवा एक वर्षापासून बंदच आहे. उत्पन्न मिळत नाही, प्रतिसाद नसल्यामुळे ही सेवा बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

त्यामुळे ८ गाड्या वापरविनाच आहेत. कोरोनाकाळात जी सेवा महामंडळास उत्पन्न मिळून दिले, महामंडळाचा तोटा भरू निघाला त्याची ही अवस्था झाली आहे.

रत्नागिरी आगारातील एसटीची महाकार्गो ही सेवा मागील एक वर्षापासून बंद आहे. यासेवेसाठी प्रतिसाद कमी मिळत आहे. त्यामुळे आगारास परवडतच नाही. त्यामुळे उत्पन्न ही कमी होत आहे. एकूण ८ गाड्या या सेवेसाठी होत्या, मात्र मागील वर्षापासून बंदच आहेत- बालाजी आडसुळे, आगार व्यवस्थापक, रत्नागिरी,

महाकार्गो सेवेत होते ही मालवाहतूक
शेतकरी, व्यापारी तसेच लघु आणि मोठे उद्योजक हे मोठ्या प्रमाणात फळे, भाजीपाला, धान्य, औद्योगिमध्ये यंत्र सामग्री, बांधकाम साहित्य, कापड उद्योगामध्ये कच्चा माल, तयार उत्पादने, फर्निचर, इतर घरगुती साहित्य, खाद्य पदार्थ, इतर किराणा वस्तू, खत, बी-बियाणे यासह विविध शेतात काम करण्यासाठी लागणारे अवजारे आदी मालवाहतूक केली जाते. प्रवासी वाहतुकीत जशी एसटी सर्वात जुनी आहे तशी मालवाहतूक व्यवसायात महामंडळ नवखे आहेत. सध्या मालवाहतुकीचे जे दर आहे ते खासगी वाहतूक दरांशी स्पर्धा करणारे आहेत. मात्र, खासगी कंपन्यांचे ग्राहक ठरलेले असतात. त्यांना तोडून एसटीच्या सेवेशी जोडण्याचे काम आव्हानात्मक आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 PM 30/May/2025