चिपळूण : परशुराम मंदिरात लाठीकाठी प्रशिक्षण

रत्नागिरी : चिपळूण येथील परशुराम संस्थान श्री भार्गवराम परशुराम व रत्नागिरी जिल्हा भारतीय लाठी महासंघाच्या संयुक्त विद्यमाने भगवान श्री परशुराम मंदिरात मुलामुलींसाठी लाठीकाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते.

या शिबिरात ६ वर्षांपासून ते ५५ वर्षांपर्यंतच्या ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. दापोली येथील सुरेंद्र साळुंखे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सहभागी प्रशिक्षणार्थीना उत्तम लाठीकाठी व दांडपट्टा शिकवला. या प्रशिक्षणाला आलेल्या सर्व मुलांनी प्रात्यक्षिके करून दाखवली व सर्व प्रशिक्षणार्थींना प्रशस्तीपत्रक देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.या वेळी भारतीय लाठी महासंघ दापोलीचे प्रशिक्षक सुरेंद्र शिंदे यांचा संस्थानच्या वतीने सन्मान करण्यात आला. या वेळी संस्थानचे विश्वस्त अभय सहस्रबुद्धे, व्यवस्थापक शंकर कानडे, प्रशिक्षक श्री. व सौ. सुरेंद्र शिंदे, अजित बाळ व अनय बाळ तसेच परशुरामचे माजी सरपंच मंजिरी जोशी, माजी सरपंच रश्मी जोशी आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:07 30-05-2025