देवरुख : कळंबुशीत घरावर झाड पडून नुकसान

देवरुख : संगमेश्व तालुक्यातील कळंबुशी येथे बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास कळंबुशीतील शेवट करंडा या वाडीतील शरद बाळकृष्ण चव्हाण यांच्या राहत्या घरावर फणसाचे मोठे झाड पडले. घराचे ३२ हजाराचे नुकसान झाले.

या वेळी शरद चव्हाण यांच्या घरी लहान मुलांसह कांही माणसे होती. परंतु कोणालाही दुखापत झाली नाही. घराच्या छप्पराचे आर्थिक दृष्ट्या खूपच नुकसान झाले आहे. पावसाळ्याचे दिवस सुरू होऊन आचानकपणे ओढवलेल्या अशा प्रसंगामुळे शरद चव्हाण कुटुंबीय घाबरून गेले आहे. सरपंच सचिन चव्हाण, गावातील ग्रामस्थ, हितचिंतक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून कुटुंबीयांना धीर दिला. व पंचयादी करण्यासाठी संबधीत यंत्रणेला पाचारण केले. नुकसान झालेल्या वस्तूस्थितीची पंचयादी करण्यात आली. यामध्ये, कौले, पत्रे, लोखंडी अँगल, चॅनल असा अंदाजे खर्च ३२ हजार रूपये अपेक्षित असून हा मदत निधी त्वरीत मिळाल्यास दिलासा मिळेल असे बोलले जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:34 30-05-2025