रत्नागिरी : शहरातील जिजामाता उद्यानामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा सर्वांत उंच पुतळा उभारण्यात आला आहे. उद्योगमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत यांची ही संकल्पना आहे. त्यांच्या आणखी एका नव्या संकल्पनेतून छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनप्रवास १९ भित्तीशिल्पातून उलगडण्यात आला आहे. विशेष म्हणजे जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण घेतलेल्या रत्नागिरीतील शिल्पकाराने ही देखणी आणि आकर्षक शिल्पं तयार केली आहेत. पर्यटकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे.
जिजामाता उद्यानामध्ये हे छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारले आहे. आज (ता. ३०) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास या स्मारकाचे लोकार्पण उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. रत्नागिरी शहरात पर्यटन विकास व्हावा यासाठी त्यांनी थिबापॅलेस येथील थ्रीडी मल्टिमीडिया शो, शिवसृष्टी, तारांगण उभारले आहे. यामुळे रत्नागिरीत न थांबणारा पर्यटकवर्ग आता थांबू लागला आहे. पर्यटनामध्ये आणखी भर घालण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.
जिजामाता उद्यान येथील छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा ज्या ठिकाणी उभारण्यात आला आहे त्याच्या पायथ्याशी असलेल्या रिकाम्या जागेत हे छत्रपती संभाजी स्मारक उभारण्यात आले आहे. सुमारे १ कोटीचे हे काम आहे. विरेंद्र वणजू कन्स्ट्रक्शन कंपनीने तीन महिन्यात हे काम पूर्ण केले आहे. प्रवेशद्वारावरच छजपती संभाजी महाराजांचे भित्तीशिल्प आहे. त्याचबरोबर त्यांचे बालपण, पेटाऱ्यातून झालेली सुटका, राज्याभिषेक अशी १९ भित्तीशिल्प उभारण्यात आली आहेत. त्यात्य आकर्षक छत आणि रोषणाई करण्यात आली आहे.
स्वप्नील हा स्थानिक शिल्पकार
बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई या संघटनेच्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आकर्षक पुतळा ठेवण्यात आला होता. पालकमंत्री यांची नजर या पुतळ्यावर पडली. त्यांनी त्यावर विचारता हा पुतळा कोणी बनवला आहे. तेव्हा जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण घेतलेल्या रत्नागिरीतील स्वप्नील कदम यांने बनवल्याचे कळले. तेव्हा सामंत यांनी छत्रपती संभाजी स्मारकातील भित्तीशिल्प उभारण्याचे काम याच स्थानिक शिल्पकाराला देण्याचा निर्णय घेतला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:26 PM 30/May/2025














