रत्नागिरी : साळवी स्टॉपपासून रत्नागिरीतील मुख्य रस्त्यावर दुतर्फा वाहने उभी केलेली असतात. त्यामुळे इतर वाहनांसह पादचाऱ्यांनाही या वाहनांच्या अडथळ्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. अशा बेशिस्त पार्किंगकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. त्याचबरोबर शहरात वाहनांची वर्दळ वाढली असल्याने वाहतूक नियंत्रणाकडेही लक्ष देण्याची गरज आहे.
साळवी स्टॉप येथून मिऱ्या नागपूर हायवेचे काम सुरू असल्याने त्याठिकाणीही दुपारी आणि संध्याकाळी मोठी वाहतूक कोंडी होताना दिसून येत आहे. या ठिकाणी होत असलेल्या वाहतूक कोंडीकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात मात्र २ ते ३ वाहतूक पोलिस ड्युटी बजावताना दिसून येत आहेत. पोलिस अधिक्षक मोहितकुमार गर्ग कार्यरत असताना भर पावसातही वाहतूक पोलिस पिवळा रेनकोट घालून वाहतूक नियंत्रण करत होते. पोलिस अधिक्षकांकडून तशा सक्त सूचना होत्या. त्या सूचनांचे वाहतूक पोलिसांकडून पालन होत होते. सध्या मात्र वाहतूक नियंत्रणाबाबत ढिलाई असल्याचे वाहन चालकांकडूनच सांगितले जात आहे.
शहरातील रस्त्यांच्या कॉक्रिटीकरणाला सुरुवात झाल्यानंतर वाहतूक सुरक्षिततेसाठी शहरातील यंत्रणा बंद ठेवण्यात आली आहे. काँक्रिटीकरणाचे काम पाऊस वेळेअगोदरच सुरू झाल्याने एक मार्गिकवरचे काँक्रिटीकरण पावसाळ्यानंतरच सुरू होऊ शकणार आहे. परिणामी, शहरात वाहतूक कोंडीची समस्या वरच्यावर निर्माण होत आहे. लवकरच शाळा, कॉलेज सुरू होतील. त्यावेळी या वाहतू कोंडीत मोठी वाढ होणार आहे. वाहतू शाखेने त्याकडे वेळीच लक्ष देणे गरजे असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:30 30-05-2025














