रत्नागिरीत येणार ‘एआय’ आधारित स्मार्ट बसेस !

रत्नागिरी : महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देत एसटी महामंडळाने आता एआप तंत्रज्ञानावर आधारित मध्या बसेस ठाण्यात सुरू केल्या आहेत. दरम्यान, राज्यासह टप्प्या टप्प्याने रत्नागिरी जिल्ह्यात ही या बसेस लवकरच येणार आहे. एआय तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणाली या बसेसमध्ये लावण्यात येणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता एसटीने बिनधास्त प्रवास कला, बसमधील प्रत्येक हालचाल सीसीटीव्हीमध्ये कैद होणार आहे.

प्रवाशांची संख्या, चालकासाठी डिजिटल मार्गदर्शन, अपघात होण्या आधीच त्याचे संकट स्मार्ट बसमधील अॅप देणार आहे.

दररोज हजारो, लाखोंच्या संख्येने प्रवासी एसटी बसने प्रवास करत आहेत. यामध्ये विशेष करून तरुणी, महिलांची सुरक्षेसाठी एआय तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणाली नव्या बसेस सुरू केल्या आहेत. त्यामुळे बसमध्ये बसलेल्या प्रत्येकांची हालचाल सीसीटीव्ही कॅमेरा टिपणार आहे. यासह प्रगत ड्रायव्हर सहाय्य प्रणाली आणि ड्रायव्हर मॉनिटरिंग कॅमेरा समोरून होणाऱ्या धडकेची सूचना, लेन बदलण्याची सूचना, ड्रायव्हर स्थिती निरीक्षण, पादचाऱ्यांशी होणाऱ्या धडकेची सूचना असणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणोंनो आता चिंता करू नका बिनधास्त एसटीचा प्रवास करा. रत्नागिरी आगारात ईलेक्ट्रीक बसबरोबरच आता स्मार्ट बसही लवकरच येणार आहे. त्यामुळे रत्नागिरीकर या नव्या बसेसची आतुरतेने वाट पाहत आहेत.

पुणेसह इतर जिल्ह्याच्या ठिकाणी महिलांवर अत्याचार, यासह विविध अनुचित घटना घडल्या आहेत. महिलाविषयी कोणतीही अनूचित प्रकार घडू नये, महिलांच्या सुरक्षेसाठी एआय आधारित स्मार्ट, डिजिटल बसेस एसटी महामंडळाने सुरू केल्या आहेत. पहिल्या टप्प्यात मुंबई, ठाणे येथे सुरू झाल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात ही या बसेस लवकरच येणार असल्याचे सांगण्यात आले.

स्मार्ट बसमध्ये असणार या सुविधा…

  • ३ बाय २ सीट असणार, टीव्ही पाहता येणार
  • बसमधीत बिघाड आता संगणकावर कळणार त्यामुळे वेळेत दुरुस्ती होणार
  • प्रवाशांना बसमध्ये सुसज्ज माहिती, संगीत, जाहिराती असणार
  • ब्लाइंड स्पॉट कॅमेरे, विडीओ निरीक्षणासाठी कॅमेरे, प्रवाशांसाठी आत कॅमेरे, समोरील कॅमेरा, मागील कॅमेरा असणार
  • प्रवासी मोजणी सेन्सर, कॅमेऱ्याच्या दृश्यासह ड्रायव्हर सहाय्य स्क्रीन
  • फोरजी, जीपीएस ट्रेकिंग व स्टोरेजसह मोबाइल एनव्हीजार प्रणाली
  • बसमध्ये सूचना देण्यासाठी सार्वजनिक घोषणा प्रणाली, तीन एलएडी स्क्रीन

“स्मार्ट बसेस रत्नागिरी आगारात कधी येणार, किती बसेस येणार याविषयी अद्याप काय माहिती आलेली नाही. अत्याधुनिक सुविधांनी असलेली डिजीटल बसेस महामंडळाकडून उपलब्ध झाल्यानंतर प्रत्यक्षात रस्त्यावर धावतील”. – प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:53 30-05-2025