संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्गावर शिंदेआंबेरीजवळ गुरुवारी (ता. २९) रात्री सावंतवाडीकडून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी आराम बसने चिपळूणहून संगमेश्वरकडे जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.
आरवली घाटात महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असून तिथे डायव्हर्शनचे योग्य नियोजन नसल्याने चिपळूणहून संगमेश्वरकडे जाणाऱ्या दुचाकीला आराम बसने धडक दिली.
हा प्रकार पाहिल्यानंतर तुरळ येथील विक्की आंबुरले जितेंद्र चव्हाण व मिलिंद चव्हाण, चैतन्य परकर हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच सहायक पोलिस निरीक्षक शंकर नागरगोजेही तिथे पोचले. आराम बसमध्ये ३५ प्रवासी होते. श्री. नागरगोजे यांनी त्या प्रवाशांची पुढील प्रवासाची व्यवस्था केली. बसचालक आर्यन अवधूत भेरे (वय २३, आरवली-वेंगुर्ला) हा पसार झाला आहे. आरवली येथे डायव्हर्शनचे माहिती फलक लावले नसल्यामुळे वाहनचालक दोन्ही बाजूने कसेही ये-जा करत होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 AM 31/May/2025














