चिपळूण : भेलसई (ता. खेड) गावालगत वीज वाहिनी तुटून ४ गावांचा वीज पुरवठा २८ मे रोजी रात्री बाधीत झाला. भेलसई व इतर गावांना वीजपुरवठा करणारी ११ केव्ही वीज वाहिनी तुटल्याने सुमारे ११०० ग्राहकांचा वीजपुरवठा प्रभावित झाला होता. काळाकुठ्ठ अंधार व मुसळधार पावसात काम करणे आव्हानात्मक होते.
मात्र महावितरण कर्मचाऱ्यांनी बॅटरीच्या उजेडात ही ११ केव्हीची वाहिनी जोडून घेतली व रात्री १०.३० च्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत केला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केलेल्या कामाचे ग्रामस्थांनी कौतूक करत आभार व्यक्त केले
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 AM 31/May/2025














