चिपळुणातील आशा सेविका पाच महिन्यांपासून मानधनाविना

चिपळूण : जनतेला समर्पित सेवा देणाऱ्या आशासेविका आणि पर्यवेक्षकांना गेल्या जानेवारी २०२५ पासून मानधन मिळाले नाही. चिपळूणमधील २७० आशा सेविका मानधनापासून वंचित आहेत. काम करूनही पैसे मिळत नसेल तर कुटुंब चालवायचे कसे असा प्रश्न आशा सेविका आणि गटप्रवर्तक करीत आहेत.

चिपळूण तालुक्यात २७० आशा सेविका आणि ११ गटप्रवर्तक आहेत. आशा सेविकांकडून ग्रामीण भागातील तसेच अतिदुर्गम आणि डोंगराळ भागातील गर्भवती महिला, स्तनदा मातांना आरोग्य सेवा पुरवली जाते. एडस, मलेरिया, डेंगी आदी रुग्णांनाही सरकारच्या सेवा पुरविल्या जातात. ५२ प्रकारच्या सेवा सेवा ग्रामीण भागात आशा सेविका पुरवितात. त्यांना सरकारकडून मानधन दिले जाते. यापूर्वी केंद्राचा ह्प्प्ता वेळेत मिळत नव्हता आता राज्याचा ह्प्प्ताही वेळेवर मिळत नाही. त्यामुळे सेविकांमध्ये नाराजी आहे. आशा सेविकेला जानेवारीपासून मानधन मिळालेले नाही. सरकार मानधन देण्यास का चालढकल करीत आहे, असा प्रश्न आशा सेविका विचारत आहेत.

आश सेविकांना मानधन मिळाले पाहिजे. ते कष्टाने ग्रामीण भागात काम करतात. सरकारने त्यांना मानधन देण्यात चालढकल केली तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून जिल्ह्यात पंचायत समित्यांवर मोर्चा काढू- बाळा कदम, चिपळूण विधानसभा क्षेत्रप्रमुख, ठाकरे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 AM 31/May/2025