पावस : जन्मापासून, मृत्यूपर्यंत ज्या ज्या काही अडचणी येतात त्याला आर्थिक ताकद देणारी कामगार विभागाची योजना आहे. ही योजना काही लोकांपुरती मर्यादित न राहता, जनसामान्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. महाराष्ट्र शासनाने ही योजना तुमच्यासाठी सुरू केलेली आहे. योजनेचा दुरुपयोग भ्रष्टाचारासाठी जर कोण करत असेल, तर त्याच्यावर पोलिस कारवाई करण्याचा निर्णय घेतलेला आहे, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
रत्नागिरी तालुक्यातील गोळप आणि पावस येथील नोंदीत बांधकाम कामगारांना पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते अत्यावश्यक संच, सुरक्षा संच व गृहोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. या वेळी सहायक कामगार आयुक्त संदेश आयरे, बाबू म्हाप आदी उपस्थित होते. पालकमंत्री सामंत म्हणाले, दोन वर्षांपूर्वी कामगार विभागाची घेतलेली ही चळवळ जी नऊ हजार लोकांच्या कामगार नोंदणीने सुरू झाली होती, ती नोंदणी ५६ हजारवर जाऊन पोहोचलेली आहे.
कुटुंबाला कामगार विभागाचा लाभ देण्याची योजना आहे. या वस्तू बघितल्या असतील तर त्याची किंमत देखील आपल्याला माहिती असेल. या दहा हजारांच्या वस्तू तुम्हाला मोफत देत असताना काही लोकांनी याच्यामध्ये दलाली देखील केलेली आहे. फॉर्म भरायला पाचशे रुपये, वस्तू द्यायला पंधराशे रुपये असा एक व्यापार देखील काही लोकांनी सुरू केला. तो व्यापार बंद करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:52 PM 31/May/2025














