रत्नागिरी : शहरातील खारेघाट रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेसमोर शुक्रवारी (३० मे २०२५) सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास एका मद्यधुंद रिक्षाचालकावर रत्नागिरी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रसन्ना पंढरिनाथ पिलणकर (वय ३६, रा. मुरुगवाडा, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल अर्चना पांडुरंग मगदूम (वय ३३) आणि चालक चापोहेकॉ/३८४ किर हे शुक्रवारी सायंकाळी डायल-११२ या सरकारी वाहनातून पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. खारेघाट रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेसमोर आले असता, त्यांना एमएच-०८/बी.सी./०४३६ या क्रमांकाची रिक्षा रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे आणि मद्यपान केलेल्या अवस्थेत चालवताना आढळली.
पोलिसांनी रिक्षाचालक प्रसन्ना पंढरिनाथ पिलणकर याला ताब्यात घेतले. त्याच्या वैद्यकीय तपासणीत त्याने मद्यपान केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर, शुक्रवारी रात्री ८.४४ वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात पिलणकर विरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१ सह मोटार वाहन कायदा कलम १८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:52 31-05-2025














