रत्नागिरीत सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल

रत्नागिरी : पुर्णगड सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावडे आंबेरे, बिर्जेवाडी येथे शुक्रवारी (३० मे २०२५) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास सार्वजनिक ठिकाणी दारू पित बसलेल्या एका व्यक्तीवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदीप प्रकाश शिवणेकर (वय ३३, रा. गावडे आंबेरे, बिर्जेवाडी, ता. जि. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत पुर्णगड सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक संदीप गजानन महाडिक (वय ४६) यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, शुक्रवारी दुपारी १ वाजता ते गस्त घालत असताना, गावडे आंबेरे येथील बिर्जेवाडी येथे रस्त्याच्या बाजूला आंब्याच्या झाडाखाली प्रदीप शिवणेकर हा ७५० मिली मापाची रॉयल ग्रीन विदेशी दारूची बाटली आणि पाण्याची बाटली घेऊन दारू पिण्यासाठी बसलेला आढळला. त्याच्याकडे दारू पिण्याचे कोणतेही अधिकृत परवाना (लायसन्स) नव्हते.

पोलिसांनी तात्काळ कारवाई करत प्रदीप शिवणेकर याला ताब्यात घेतले. त्यानंतर, शुक्रवारी दुपारी २.४१ वाजता पुर्णगड सागरी पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पुर्णगड सागरी पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 31-05-2025