खेड : खेड तालुक्यातील संगलट, बौध्दवाडी येथे शुक्रवारी (३० मे २०२५) सकाळी ११.४० वाजण्याच्या सुमारास अवैधरित्या हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी सुधीर धर्मा तांबे (वय ५७, रा. संगलट, बौध्दवाडी, ता. खेड) याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खेड पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई किरण नामदेव चव्हाण (वय ३०) यांनी याबाबत फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, शुक्रवारी सकाळी ११.४० वाजता त्यांना मिळालेल्या माहितीनुसार, सुधीर तांबे हा त्याच्या राहत्या घराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत हातभट्टीची दारू बेकायदेशीररीत्या लोकांना चढ्या भावाने विक्री करत होता.
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी छापा टाकला असता, सुधीर तांबे याच्या ताब्यातून ९१० रुपये किमतीचे २० लिटर क्षमतेचे काळ्या रंगाचे प्लॅस्टिकचे कॅन आणि त्यामध्ये ९ लिटर हातभट्टीची गावठी दारू भरलेले एक प्लॅस्टिक कॅन (या कॅनची किंमत १०० रुपये) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शुक्रवारी दुपारी ३.२० वाजता खेड पोलीस ठाण्यात सुधीर धर्मा तांबे याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 31-05-2025














