रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील बाणेवाडी, नाटे येथील ६० वर्षीय महिलेचा जुलाब आणि उलटीचा त्रास झाल्याने उपचारादरम्यान रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. अंजली अंकुश चव्हाण (वय ६०, रा. बाणेवाडी, नाटे, ता. राजापूर) असे या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. ही घटना बुधवार, २८ मे २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अंजली चव्हाण यांना २८ मे रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घरी झोपेत असताना अचानक जुलाब आणि उलटीचा त्रास सुरू झाला. कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ गावाजवळील डॉ. नईम बोरकर यांच्याकडे उपचारासाठी नेले. त्यानंतर, धारतळे येथील सरकारी दवाखान्यातही त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
मात्र, प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची नोंद रत्नागिरी पोलीस ठाण्यात गुरुवारी (३० मे २०२५) रात्री १०.४१ वाजता करण्यात आली असून, अकस्मात मृत्यू क्रमांक ११/२०२५ बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 31-05-2025














