खेड : तालुक्यातील कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात गुरुवारी, २९ मे रोजी पहाटे एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मेहबुब रुकमोद्दीन नदाफ (३६, रा. आरबळी, येवती, तुळजापूर, जि. उस्मानाबाद) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नदाफ याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने १०८ रुग्णवाहिकेने खेड रेल्वे स्थानकावरून कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात गुरुवारी पहाटे १.५० वाजता दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान पहाटे २.१० वाजता त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:26 AM 31/May/2025














