राजापूर : येथील रिक्त असलेल्या नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी शासनाने तुषार बाबर यांची नियुक्ती केली आहे.
श्री. बाबर हे यापूर्वी रत्नागिरी नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी कार्यरत होते. रत्नागिरीच्या मुख्याधिकारीपदी श्री वैभव गारवे यांची नियुक्ती झाल्यानंतर श्री बाबर हे पदस्थापनेच्या प्रतीक्षेत होते.
तर राजापूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त भार श्री. गारवे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. आता राजापूर नगर परिषदेच्या पूर्णविळ मुख्याधिकारीपदी श्री तुषार बाबर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 AM 31/May/2025














