रत्नागिरी : शतकोत्तर हिरक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या राजापूर नगर वाचनालयात ग्रंथ देवघेव सेवा संगणकीकृत करण्यात आली आहे.
बदलत्या काळानुसार जलद गतीने ग्रंथालय सेवा देण्यात यावी, या उद्देशाने ग्रंथालयातील ग्रंथांचे संगणकीकरण करण्यात आले आहे.
याचा पुढचा टप्पा म्हणून सभासदांना ग्रंथ देवघेव सुलभ व जलद गतीने व्हावी याकरिता ग्रंथ देवघेव सेवा संगणकीकृत करण्याचा प्रारंभ संस्थेचे ज्येष्ठ सभासद वाचक हितचिंतक जयंत कदम यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी संस्थेचे पदाधिकारी कार्यवाह जयंत अभ्यंकर, सुहास ओळकर, राजेंद्र रानडे, जयेश हर्डीकर उपस्थित होते. वाचक सभासद श्री. लोकरे, जैतापकर, गवाणकर, वाचनालयाचे कर्मचारी ग्रंथपाल पद्मजा कारेकर, सहायक ग्रंथपाल लोचनी साळवी, लिपीक साईशा पड्यार, सेवक अनिकेत नाडणकर उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:13 31-05-2025














