लांजा : तालुक्यातील निवसर येथील ५४ वर्षीय मेघा मंगेश कांबळे यांचा रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेघा कांबळे यांना सन २०२२ पासून मणक्याचा आजार, रक्ताची कमतरता (अशक्तपणा) आणि उच्च रक्तदाब असे अनेक आजार होते. त्यांच्यावर नियमित औषधोपचार सुरू होते. २५ मे २०२५ रोजी रात्री ९ वाजता जेवण केल्यानंतर मेघा कांबळे त्यांच्या शेजारी राहणाऱ्या दिरांच्या घरी गप्पा मारण्यासाठी गेल्या होत्या. रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास त्यांना धाप लागली, श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि उलट्याही झाल्या.
त्यानंतर त्यांना तातडीने शेजाऱ्यांच्या मदतीने प्रथम ग्रामीण रुग्णालय, पाली येथे नेण्यात आले. तेथून अधिक उपचारांसाठी त्यांना १०८ रुग्णवाहिकेने सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी येथे आणण्यात आले. २६ मे २०२५ रोजी मध्यरात्री २.३५ वाजता त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकारी, डॉ. योगेश नागरगोजे यांनी तपासणी करून मेघा मंगेश कांबळे यांना मृत घोषित केले. लांजा पोलीस ठाण्यात या घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 PM 31/May/2025














