चिनी सैन्याकडून भारताच्या हद्दीत सातत्याने होणारी घुसखोरी आणि गलवान येथे भारत आणि चीनच्या सैन्यदलांमध्ये झालेल्या झटापटीनंतर दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे तणावपूर्ण बनलेले आहेत. या दरम्यान, चिनी दूतावासाने आपल्या नागरिकांसाठी सक्त इशारा दिला आहे.
त्यात चिनी नागरिकांना भारत आणि नेपाळ यांच्यातील सीमेजवळ जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. भारतामध्ये अवैधपणे प्रवेश केल्यास कठोर कारवाईचा सामना करावा लागू शकतो, असेही चिनी दूतावासाने म्हटले आहे.
याबाबत माहिती देताना चीन सरकारचं मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सने आपल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे की, भारत आणि नेपाळने सीमावर्ती भागांमध्ये गस्त आणि शोधमोहीम खूप वाढवली आहे. असं असतानाही इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत काही चिनी नागरिक हे भारत आणि नेपाळच्या सीमेजवळ जात आहेत. हल्लीच असे प्रकार अनेकदा समोर आले आहेत. ज्यामध्ये भारतीय सीमा सुरक्षा दलाने त्यांना अवैध प्रवेश केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.
या रिपोर्टनुसार चीनकडून सांगण्यात आले की, भारत आणि नेपाळ यांच्यामधील सीमा खुली आहे. इथे सीमाभाग दर्शवणाऱ्या खाणाखुणा खूपच कमी आहेत. येथून नेपाळी आणि भारतीय नागरिक आपलं ओळख पत्र दाखवून सीमा पार करू शकतात. मात्र परदेशी नागरिकांना वैध व्हिसा असल्याशिवाय या सीमेवरून भारतामध्ये प्रवेश करण्याची परवानगी नाही आहे. अशा परिस्थितीत जर कुणी नागरिकाने चुकून भारताची सीमा पार केली, तर त्याला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
चीनने सांगितले की, भारतामध्ये बेकायदेशीर प्रवेशाबाबतचे कायदे कठोर आहेत. तसेच या परिस्थितीत दोषी व्यक्तीला २ ते आठ वर्षांची शिक्षा होऊ शकते. तसेच येथे अनावधानाने जरी प्रवेश केला. तरी अटकेची कारवाई होऊन खटला चालू शकतो. तसेच या स्थितीत दोषी व्यक्तीला २ ते ८ वर्षांचा तुरुंगवास आणि जबर दंडात्मक कारवाई होऊ शकते. त्यात जामिन देण्याची कुठलीही तरतूद नाही आहे. तसेच कुठल्याही आणिबाणीच्या परिस्थितीत चिनी नागरिकांनी त्वरित नेपाळमधील दूतावासाशी संपर्क साधावा, असं आवाहनही चीनकडून करण्यात आलं आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:13 31-05-2025














