अडरे : कामगारांना विमा संरक्षण, आरोग्याच्या सुविधा, भविष्य निर्वाह निधी मिळणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार शेखर निकम यांनी केले. तसेच कामगारांची मुले शिक्षणापासून वंचित राहता कामा नये यासाठी सर्वोत्तोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे बांधकाम कामगारांना अत्यावश्यक व सुरक्षा साहित्य वाटप कार्यक्रमावेळी ते बोलत होते. गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या भाऊसाहेब महाडिक सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी कामगारांना हेल्मेट, सेफ्टी शूज, हातमोजे, पाणी बॉटल, बॅटरी आणि इतर आवश्यक सुरक्षा उपकरणांचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) असंघटीत कामगार जिल्हाध्यक्ष नारायण खुराटे, माजी सभापती पूजा निकम, सावर्डे सरपंच समीक्षा बागवे, सावर्डे उपसरपंच जमीर मुल्लाजी, राजन लवेकर, जागृती शिंदे, नीलेश कदम, रमेश राणे, अशोक कदम, सुभाष मोहिरे, शौकत माखजनकर, विजय भुवड, शांताराम बागवे, राजेंद्र वारे, ऋतुजा मापुस्कर व कामगार उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:24 PM 31/May/2025














