लांजा : येथील बसस्थानकाच्या समोरच अपघात झाला. एसटी बसचे चाक पायावरून गेल्याने वृध्दाचे दोन्ही पाय निकामी झाले. या घटनेने परिसरात तोबा गर्दी जमली होती. नागरिकांनी बस रोखून धरली. ही घटना शनिवार 31 मे रोजी 12 वाजण्याच्या सुमारास घडली.
सविस्तर वृत्त असे की, दुपारी एक वृध्द पादचारी रस्त्याच्या कडेने जात असताना बसची धडक बसली. या धडकेत पादचाऱ्याच्या पायावरून चाक गेल्याने दोन्ही पाय निकामी झाले आहेत.
अपघाताची घटना घडताच नागरिकांची गर्दी जमली होती. जखमीला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. जमावाने रस्ता रोखून धरला. दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी होताच पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस दाखल होताच जमावाला शांत करून रस्ता मोकळा करण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:44 PM 31/May/2025














