रत्नागिरी : शहरानजीकच्या साळवी स्टॉप जवळील झोपडपट्टीत बुधवारी रात्री ८.३० वा. सुमारास जेवण करताना गरम पाण्याचे पातेले अंगावर पडून तरुण भाजून जखमी झाला. त्याला उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कैसर सय्यद अली (३०, रा. साळवी स्टॉप, रत्नागिरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. बुधवारी रात्री तो जेवण बनवत असताना गरम पाण्याचे पातेले अंगावर पडून तो १० टक्के भाजला. याबाबत जिल्हा शासकीय रुग्णालयात पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:56 PM 31/May/2025














