गुहागर : तालुक्यातील मोडकाआगर धरण मे महिन्यातच तुडुंब भरण्याची पहिलीच वेळ असल्याची चर्चा गुहागर परिसरात सुरू आहे. प्रतिवर्षी जून महिन्यात जोराचा पाऊस पडला तरच धरण भरत असते. परंतु, यावर्षी मान्सूनपूर्व पडलेल्या वळीव पावसाने हे धरण भरले आहे.
मोडकाआगर धरणातून वरवेली, गुहागर, असगोली, पालशेत, पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या नळपाणी योजनेअंतर्गत धरणालगत असलेल्या विहिरीच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. या धरणामध्ये खासगी स्वरूपात जल पर्यटन सुरू आहे. गेल्या १८ वर्षांमध्ये मे महिन्यामध्ये एवढा पाऊस पडला असल्याचे पाहण्यात नाही. तसेच मोडकाआगर धरण मे महिन्यात कधीच भरले नसल्याची माहिती येथील विशाल बोटिंग क्लबचे विश्वनाथ रहाटे यांनी दिली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:09 PM 31/May/2025














