खेड : जागतिक तंबाखू मुक्ती दिनानिमित्त ब्रह्माकुमारीची जनजागृती मोहीम

खेड : जागतिक तंबाखू मुक्ती दिनानिमित्त प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या खेड सेवा केंद्राच्या वतीने खेड बसस्थानक आणि रेल्वे स्थानक येथे विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात आली.

या मोहिमेद्वारे तंबाखू आणि विविध व्यसनांचे व्यक्ती, कुटुंब, समाज आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणारे दुष्परिणाम नागरिकांना समजावून सांगण्यात आले. या उपक्रमात चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून व्यसनमुक्त जीवनाचे महत्व अधोरेखित करण्यात आले.

ब्रह्माकुमारी गीता व ब्रह्माकुमारी स्वरूपा यांच्या मार्गदर्शनाखाली राजयोग अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या जनजागृती उपक्रमात सक्रीय सहभाग घेतला. त्यांनी नागरिकांशी संवाद साधत व्यसनमुक्त जीवनशैलीचे फायदे समजावले आणि राजयोग ध्यानसाधनेचे महत्त्व पटवून दिले.

या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडून येईल, असा विश्वास ब्रह्माकुमारी सेवा केंद्राच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:43 PM 31/May/2025