BPCL मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! इंजिनिअरिंग, QA आणि सेक्रेटरी पदांसाठी भरती सुरू

मुंबई, 31 मे 2025 : भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) ने ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (इंजिनिअरिंग), असोसिएट एक्झिक्युटिव्ह (इंजिनिअरिंग), असोसिएट एक्झिक्युटिव्ह (क्वालिटी अ‍ॅश्युरन्स), सेक्रेटरी बीपीसीएल या पदांसाठी आणि अनुभवी प्रोफेशनल्ससाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना बीपीसीएलमध्ये करिअर घडवण्याची ही एक उत्तम संधी आहे.

पदांचे तपशील आणि आवश्यक पात्रता:
या भरती मोहिमेअंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव खालीलप्रमाणे आहे:

ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (इंजिनिअरिंग):

इंजिनिअरिंग डिप्लोमा (मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स / सिव्हिल / केमिकल)
05 वर्षांचा अनुभव
वयाची अट: 32 वर्षांपर्यंत (01 मे 2025 रोजी)

असोसिएट एक्झिक्युटिव्ह (इंजिनिअरिंग):

B.Tech / B.E. / B.Sc (Engg) (मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स / सिव्हिल / केमिकल)
03 वर्षांचा अनुभव
वयाची अट: 32 वर्षांपर्यंत (01 मे 2025 रोजी)

ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (इंजिनिअरिंग) [दुसरे पद]:

60% गुणांसह पदवीधर
Inter CA / Inter CMA + पदवी
05 वर्षांचा अनुभव
वयाची अट: 30 ते 35 वर्षे (01 मे 2025 रोजी)

असोसिएट एक्झिक्युटिव्ह (क्वालिटी अ‍ॅश्युरन्स):

M.Sc (केमिस्ट्री) + ऑरगॅनिक / फिजिकल / इनऑरगॅनिक / अ‍ॅनॅलिटिकल केमिस्ट्रीमध्ये स्पेशलायझेशन
03 वर्षांचा अनुभव
वयाची अट: 32 वर्षांपर्यंत (01 मे 2025 रोजी)

सेक्रेटरी BPCL:

60% गुणांसह पदवीधर (10वी आणि 12वी मध्ये 60% गुण आवश्यक)
05 वर्षांचा अनुभव
वयाची अट: 32 वर्षांपर्यंत (01 मे 2025 रोजी)

टीप: सर्व पदांसाठी, जनरल/ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना किमान 60% गुण आवश्यक आहेत, तर SC/ST/PWD प्रवर्गातील उमेदवारांना 55% गुण असणे अनिवार्य आहे. वयोमर्यादेत SC/ST प्रवर्गासाठी 05 वर्षे आणि OBC प्रवर्गासाठी 03 वर्षांची सूट मिळेल.

अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा:
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 जून 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अर्ज शुल्क:

जनरल/ओबीसी/EWS प्रवर्गासाठी: ₹1180/-
SC/ST/PWD प्रवर्गासाठी: फी नाही
नोकरीचे ठिकाण: निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात कुठेही नोकरी मिळू शकते.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिक माहितीसाठी तसेच अर्ज करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/bpclmay25/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:02 31-05-2025