RCFL Bharti 2025 : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी सुवर्णसंधी! RCFL मध्ये 75 पदांसाठी भरती जाहीर

मुंबई : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) ने विविध पदांसाठी एकूण 75 जागांची भरती जाहीर केली आहे. ‘जाहिरात क्र. 05022025’ अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवली जात असून, यामध्ये अधिकारी (फायनान्स), मॅनेजमेंट ट्रेनी (विविध शाखा) आणि अधिकारी (सेक्रेटरीयल) या पदांचा समावेश आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

पदांचा तपशील आणि आवश्यक पात्रता:

  • 1. ऑफिसर (फायनान्स) – 10 जागा:
    • शैक्षणिक पात्रता : सीए/सीएमए किंवा बी.कॉम, बीएमएस, बीएएफ, बीबीए यांसारख्या पदवीसह एमबीए.
    • वयाची अट : 01 फेब्रुवारी 2025 रोजी 34 वर्षांपर्यंत.
    • नोकरी ठिकाण : मुंबई.
  • 2. मॅनेजमेंट ट्रेनी (Boiler/Marketing/Chemical/ Mechanical/ Environment/ Electrical/ Instrumentation/ Civil/Industrial Engineering/HR) – 57 जागा:
    • शैक्षणिक पात्रता : बी.ई. / बी.टेक (केमिकल/पेट्रोकेमिकल/मेकॅनिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/फायर अँड सेफ्टी) किंवा कोणत्याही शाखेतील पदवीसह एमबीए किंवा कृषी पदवीसह एमबीए.
    • वयाची अट : 01 फेब्रुवारी 2025 रोजी 27 वर्षांपर्यंत.
    • नोकरी ठिकाण : मुंबई.
  • 3. ऑफिसर (सेक्रेटरीयल) – 08 जागा:
    • शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी आणि एमबीए, तसेच 10 वर्षांचा अनुभव आवश्यक.
    • वयाची अट : 01 फेब्रुवारी 2025 रोजी 40 वर्षांपर्यंत.
    • नोकरी ठिकाण : मुंबई.

अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा:

  • अर्ज शुल्क : सर्वसाधारण/ओबीसी/ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹1000/- शुल्क आहे. तर, एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/माजी सैनिक आणि महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क लागणार नाही.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 16 जून 2025 (सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत).
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक : इच्छुक उमेदवार https://ibpsonline.ibps.in/rcfmtapr25/ या लिंकवर जाऊन अर्ज करू शकतात.
  • परीक्षेची तारीख : परीक्षेची तारीख नंतर जाहीर केली जाईल.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन RCFL द्वारे करण्यात आले आहे.