संगमेश्वर : टेम्पो-दुचाकी धडक; दुचाकीस्वार जखमी

संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पैसाफंडजवळ टेम्पो आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात येणार आहे. हा अपघात शनिवारी (ता. ३१) घडला.

येथील अपघातात दिनेश गजानन पांचाळ (रा. कोळंबे, संगमेश्वर) हे जखमी झाले आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दीपक कृष्णा सुतार (वय वर्ष ३० रा. कोल्हापूर) हा टेम्पो घेऊन मुंबई-गोवा राष्ट्रीय माहामार्गावरून संगमेश्वर ते शास्त्रीपूल असे जात होता पैसाफंड येथे दुचाकी-टेम्पोची धडक झाली. दुचाकीस्वार दिनेश पांचाळ हे दुचाकी घेऊन काही कामानिमित्त चिपळूण ते संगमेश्वर जात होते.

त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची चर्चा सुरू होती. यामध्ये दुचाकीचा काही भाग टेम्पोच्या पुढच्या चाकाखाली आला होता. अपघातात जखमी झालेले दिनेश पांचाळ यांना जवळच असलेल्या संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 AM 02/Jun/2025