रत्नागिरी, 31 मे 2025 : राजापूर नगरपरिषदेजवळील भाजी मार्केटमध्ये असलेल्या फुलांच्या दुकानात किरकोळ कारणावरून एका दुकानदाराला गंभीर मारहाण करण्यात आल्याची घटना दि, 31 मे रोजी सकाळी 8.10 वाजता घडली. या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नामदेव राजाराम आडविलकर (वय 51) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सुभाष शाम बाकाळकर (वय 42) आणि विनोद शाम बाकाळकर (वय 39) या दोन आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 118(1), 115(2), 352, 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी नामदेव आडविलकर यांच्या फुलांच्या दुकानात आरोपी आले होते. त्यांनी सांगितलेले हार तयार झालेले नसल्याने, आरोपींना राग आला. त्यापैकी एकाने ‘तुला मस्ती आली आहे’ असे बोलून फिर्यादीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपी क्रमांक 1 आणि 2 यांनी फिर्यादीच्या दुकानातील कैचीने त्यांच्या हाताला गंभीर दुखापत केली. एवढेच नाही तर, दुकानातील लाकडी फळीने त्यांच्या छातीवर, पोटावर आणि पाठीवर मारहाण करत मुक्का मार दिला. या घटनेमुळे भाजी मार्केट परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. राजापूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 02-06-2025














