रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील नाटे येथील धावुलवल्ली आंबेलकरवाडी येथील 71 वर्षीय लक्ष्मण धोंडू वेलये यांचा सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी येथे उपचारापूर्वीच मृत्यू झाला. घरी काम करत असताना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
ही घटना 30 मे 2025 रोजी सकाळी 9:15 वाजताच्या सुमारास घडली. लक्ष्मण धोंडू वेलये यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने तात्काळ 108 रुग्णवाहिकेने रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच, म्हणजेच 30 मे रोजी सकाळी 9:15 वाजता, मृत घोषित केले. या प्रकरणी आकस्मिक मृत्यू क्रमांक 12/2025 अन्वये बी.एन.एस.एस 194 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 02-06-2025














