रत्नागिरी : प्रमोद महाजन क्रीडा संकुलाजवळ गांजाचे सेवन करणारा एक ताब्यात

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील प्रमोद महाजन क्रीडा संकुलाच्या पाठीमागील बाजूस गांजासदृश्य अंमली पदार्थाचे सेवन करत असताना एका व्यक्तीला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. ही घटना दि, 31 मे रोजी सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास घडली.

या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोहेकॉ/1399 अमोल अरुण भोसले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गुन्हा रजिस्टर नंबर 223/2025 अंतर्गत अंमली औषधी द्रव्य व मन प्रभावी पदार्थ अधिनियम 1985 च्या कलम 8 (क) आणि 27 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोईन सलीम अलजी (वय 34) हा प्रमोद महाजन क्रीडा संकुलाच्या मागील बाजूस बेकायदेशीररित्या गांजासदृश्य अंमली पदार्थाचे सेवन करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याला जागेवरच ताब्यात घेतले.

रत्नागिरी जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या विरोधात पोलीस दलाची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून, अशा प्रकारच्या कारवाया सुरूच राहतील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तरुण पिढीला अंमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचे या कारवाईतून दिसून येते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 02-06-2025