लांजा : चाफेट येथे दरड कोसळली

लांजा : लांजा तालुक्यातील चाफेट येथे शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दरड कोसळल्याने नेमणवाडी-शिंदेवाडी रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला आहे. नव्याने तयार करण्यात आलेला हा रस्ता गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे कमकुवत झाला होता, ज्यामुळे रस्त्याच्या बाजूला असलेली दरड कोसळली.

या घटनेमुळे नेमणवाडी आणि शिंदेवाडीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. स्थानिक नागरिकांनी रस्त्यावरील दरड हटवून वाहतूक लवकरात लवकर पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाकडून यावर तातडीने उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:59 AM 02/Jun/2025