चिपळूण : जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून जिल्हाभरात सर्व क्षेत्रात सामाजिक सलोखा राखण्यात यावा, शांततेचा संदेश देण्यात यावा यासाठी पोलिस ठाणे अंतर्गत सामाजिक सलोखा समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याची पहिली बैठक अलोरे शिरगाव पोलिस ठाण्यात झाली.
यावेळी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक़ भारत पाटील यांनी यांनी मार्गदर्शन केले. आगामी बकरी ईद, इतर सामाजिक कार्यक्रम, आपत्ती व्यवस्थापन, अमली पदार्थ विरोधी मोहीम, अवैध गोवंशीय प्राण्यांचे वाहतूक, गोमांस वाहतूक बाबत माहिती मिळाल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी. कोणीही कायदा हातात घेऊ नये तसेच इतर अनेक मुद्द्यांवर मार्गदर्शन केले.
सदरच्या समितीत सुरुवातीला विविध क्षेत्रातील ३० व्यक्तींचा समावेश असून यानंतर आणखी २० जणांचा समावेश करण्यात येणार आहे. यानंतर भरत पाटील यांनी समितीचा उद्देश सांगितला. तसेच शिरगाव पोलिस ठाण्यात हद्दीत प्रकरणे सोडविताना पंचक्रोशीतील गावांनी उत्तम सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद दिले. यावेळी शिरगावचे माजी सरपंच सुधीर शिंदे यांनी नूतन पोलिस
अधीक्षक नितीन बगाटे यांच्या सामाजिक सलोखा समितीच्या संकल्पनेचा आदरपूर्वक सन्मान करीत सर्वानुमते अभिनंदनाचा ठराव केला.
तसेच शिरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक़ भरत पाटील हे उत्तमप्रकारे काम करीत असून त्यांनी मुख्यमंत्री यांच्या ७ कलमी कार्यक्रम अंतर्गत अलोरे शिरगाव पोलिस ठाण्यास आधुनिक स्वरूप प्राप्त करुन उत्तमरित्या सजविले आहे. या बद्दल त्यांचे अभिनंदन केले.
या बैठकीला पंचकोशीतील विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तसेच नागरिक उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:48 PM 02/Jun/2025














