रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांची कोल्हापूर येथे बदली झाली आहे.
गेले तीन वर्ष त्या जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी होत्या. शासनाने ३१ मे पर्यंत तीन वर्ष कालावधी पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. राज्यात तब्बल २६ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये रत्नागिरीच्या सावंत यांचीसुद्धा बदली झाली आहे. त्यांची कोल्हापूर माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे; मात्र रत्नागिरी माध्यमिक शिक्षणाधिकारी या पदावर कोणाचीही नियुक्ती झालेली नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:53 02-06-2025













