माखजन : तुडुंब पाण्याने भरलेली शेती आणि पावसाची संततधार यामुळे यावर्षी भातपेरणी कशी होईल या चिंतेत असलेल्या शेतकऱ्याला पाऊस थांबल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. पाऊस थांबताच भातपेरणीची लगबग पाहायला मिळत आहे.
हवामान खात व कृषी खात्याने दिलेल्या माहितीनुसार २९ ताखेनेनंतर सुरू पावसाचा जोर उतरला. सध्या सर्वत्र भातपेरणीला वेग आला आहे. बहुतांश ठिकाणी ट्रॅक्टर च्या साहाय्याने भातपेरणी केली जात असल्याने, भात पेरणीच्या वेग देखील दुप्पट आहे. पाऊस थांबून कडकडीत ऊन पडल्याने सर्वत्र शेती सुकली आहे. त्यामुळे पेरणी सुद्धा चांगल्या प्रकारे होत आहे. पेरणी होताच फोड, बेर आदी गोष्टी पूर्ण करण्याचा शेतकऱ्यांचा कल दिसत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:05 PM 02/Jun/2025














