खेड : खेड-भरणे मार्ग नेहमीच वाहनांसह पादचाऱ्यांच्या रेलचेलीने गजबजलेला असतो. या मार्गावर मोकाट जनावरांचा वावर दिवसागणिक वाढत आहे. यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. मोकाट जनावरांच्या मालकांवर कारवाईसाठी कोणीच पुढाकार घेत नसल्याने मालकांचे फावत आहे.
बऱ्याचवेळा मोकाट जनावरे भर रस्त्यातच बस्तान ठोकत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. मोकाट जनावरांपाठोपाठ भटक्या कुत्र्यांचा वावर देखील पुन्हा वाढू लागला आहे. मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरुन मार्गस्थ व्हावे लागत आहे. नगर प्रशासनासह भरणे ग्रामपंचायतीने मोकाट जनावरांच्या मालकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
खेड-भरणे मार्गावर वाढत्या अतिक्रमणाने वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. त्यातच मोकाट जनावरांच्या मुक्त संचाराने वाहनचालक हैराण झाले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:05 PM 02/Jun/2025














