रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील चर्मालय ते चंपक मैदान मार्गावर सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवार, १ जून रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश कृष्णा पवार (वय ३९) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आरोपी नबीरसुल लाळेमशाक गच्छीनमनी (वय २४) याने त्याच्या ताब्यातील एम.एच.०८ ए.पी. ४३४६ क्रमांकाची पिकअप गाडी चर्मालय ते चंपक मैदानकडे जाणाऱ्या रस्त्यावर अशा प्रकारे उभी केली होती की, त्यामुळे रहदारीला मोठा अडथळा निर्माण झाला होता.
या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात १ जून रोजी सायंकाळी ७ वाजून २० मिनिटांनी करण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम २८५ नुसार गुन्हा क्रमांक २२५/२०२५ दाखल करण्यात आला आहे.
सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याने इतर वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो. अशा कृतींमुळे अपघाताची शक्यताही वाढते. त्यामुळे, पोलिसांनी वाहतुकीचे नियम पाळून सहकार्य करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:13 02-06-2025














