रत्नागिरीत ज़की खान मित्रपरिवाराच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद : १३६ जणांचे रक्तदान!

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते श्री. ज़की खान मित्रपरिवाराच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला जिल्ह्याभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे संपन्न झालेल्या या शिबिरात तब्बल १३६ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे, पुरुष रक्तदात्यांच्या बरोबरीने महिला रक्तदात्यांची संख्याही लक्षणीय होती, जे सामाजिक कार्यात महिलांचा वाढता सहभाग दर्शवते. रक्ताची वाढती गरज लक्षात घेता, अशा शिबिरांमुळे अनेकांना जीवनदान मिळते.

हे शिबीर यशस्वी करण्यासाठी श्री. ज़की खान यांच्यासह रशिद काझी, फरहान काद्री, सर्जिल भट्टीवाले, मुजाहिद जमादार, मंजूर शेख, समीर कादरी, दानिश जमादार, सादिक सैयद, आयान शेख, सुफियान शेख, समी घरे, कय्युम काझी, फुरकान रस्ता, रजिन वस्ता आणि निहाल काद्री या सर्व सहकाऱ्यांनी तसेच ब्लड बँक रत्नागिरीने खूप मेहनत घेतली.

यावेळी श्री. ज़की खान यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार व्यक्त केले आणि यापुढेही समाजसेवेत अशीच साथ देण्याचे आवाहन केले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील आरोग्यसेवेला मोठा हातभार लागला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:13 02-06-2025